राज्यभरात सरळसेवेने पदभरती होणार असून या भरतीसाठी IBPS या एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेचा पेपर काढणे, तपासणी व अनुषंगिक कार्यवाही या एजन्सीमार्फत होवून प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
ज्या उमेदवारांनी मार्च 2019 मध्ये परीक्षेसाठी अर्ज केलेला नव्हता त्यांनाही आता 2 वर्षे वयोमर्यादेत शिथीलता देण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांना संधी मिळणार आहे. इच्छुकांनी आपापल्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर जावून रिक्त पदांचा तपशील, शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, परीक्षा शुल्क, मुदत, व इतर अटी व शर्तींची माहिती घ्यावी.
तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या वेबसाईटला भेट द्यावी. परीक्षेची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे.
सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.