ज्या युवकाबद्दल आपण जाणून घेण्यास इच्छुक आहात त्याचे नाव सौरभ जोशी आहे, त्याचे वय 24 आहे. तो मुळचा उत्तराखंड मधील आहे. मात्र 20 वर्षापूर्वी त्याचे वडील हरियाणा मध्ये येवून राहू लागले, सौरव जोशी शिक्षण घेत असतांना सायकल ये-जा करत असे.
त्याचे वडील एक सामान्य पेंटर होते, घरांना कलर देण्याचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते, मात्र त्यातून जास्त काही उतर नव्हते. मात्र आता सौरवमुळे सगळे चित्रच बदलून गेले आहे. सौरवणे सुरूवातीच्या काळात खुप धडपड केली मात्र युट्यूबने त्याचे आयुष्य बदलून टाकले.
सौरवने सुरूवातीला युट्यूब चॅनल सुरू केले परंतू त्याला अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही, परंतू त्याने प्रयत्न सुरूच ठेवले, लॉकडाउन दरम्यान त्याने एक व्हिडीओ बनवला आणि यूट्यूबवर टाकला, तो व्हिडीओ एवढा व्हायरल झाला की त्याचे नशीबच बदलून गेले. सौरव Vlog Youtube channel चालवतो.
हा चॅनलचा प्रकार म्हणजे आपण दिवसभरात काय करतो, कुठे जातो, प्रेक्षणीय स्थळांची भेट, म्हणजेच दिवसभरातील सर्व घडामोडी याचे व्हिडीओ बनवून तो चॅनलवर अपलोड करत राहीला. आज त्याच्या चॅनलवर 20 मिलियन म्हणजेच 2 कोटी Subscribers आहेत. सर्वांचे अंदाज वेगवेगळे असू शकतात मात्र एका रिपोर्टनुसार त्याची दिवसाची कमाई दिड ते 2 लाख रूपये आहे.
म्हणजेच तो महिन्याला 60 लाख किंवा त्यापेक्षाही जास्त पैसे कमवतो. यूट्यूब फक्त पाहण्यापूरते मर्यादित राहीले नसून आज देशभरात किंवा जगभरात कोट्यावधी लोक आपले ज्ञान किंवा माहिती किंवा आपली आवड याची माहिती व्हिडीओ स्वरूपात अपलोड करून लाखो रूपये कमवत आहेत…. धन्यवाद…. आपणास ही स्टोरी आवडल्यास आपल्या मित्रांनाही शेअर करा…
सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…
मित्रांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नियमित मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.