शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतामध्ये तार कुंपण करून त्यांच्या पिकांचे जनावरांपासून अथवा प्राण्यांपासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने तार कुंपण योजना महत्वाची आहे. सदरील योजना डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास प्रकल्पा अंतर्गत राबविण्यात येत असून योजने अंतर्गत वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
सदरील योजने अंतर्गत शेतकऱ्यांना तार कुंपणसाठी 90 टक्के पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. सदरील योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल. संबंधित अधिकारी योजने अंतर्गत लागणारी कागदपत्रे व इतर माहिती आपल्याला देतील.
सदरील तार कुंपण योजना सध्या व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच लागू असून आपल्या क्षेत्रात ही योजना लागू आहे किंवा नाही यासाठी आपणास आपल्या पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल.
सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…
मित्रांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नियमित मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.