व्‍हाट्सअॅप चॅनल कसे सुरू करायचे ? कोणाला सुरू करता येणार ! माहिती खाली वाचा…

व्‍हाट्सअॅपने मागील काही वर्षात आणलेला सर्वात महत्‍वाचा फिचर म्‍हणजे Whatsapp Channel होय. कारण व्‍हाटसअॅपसाठी तर हे पाऊल महत्‍वाचे ठरणारच आहे परंतू तुम्‍हा आम्‍हा सर्व वापरकर्त्‍यांसाठी हा पर्याय नक्‍कीच उपयोगी ठरणार आहे. आता पाहू या Whatsapp Channel Create कसा करता येईल आणि कोणाला करता येईल.

व्‍हाट्सअॅपने Channel चा पर्याय नुकताच लॉन्‍च केला आहे, चॅनल सुरू करण्‍यासाठी सर्वात आधी तुम्‍हाला Whatsapp Update करावे लागेल. अपडेट केल्‍यानंतर तुम्‍हाला खालच्‍या बाजूला Update हा पर्याय दिसेल. या पर्यायामध्‍ये तुम्‍हाला Status आणि Channel हा पर्याय दिसेल, Channel च्‍या समोर असलेल्‍या + या चिन्‍हावर क्लिक केल्‍यावर जर तुम्‍हाला Create Channel option दिसत असेल तर तुम्‍हाला चॅनल सुरू करता येईल, नसता तुम्‍हाला तेथे Find Channel दिसेल. याचा अर्थ सध्‍या तुम्‍ही इतरांचे चॅनल शोधू शकता.

याचाच अर्थ Whatsapp ने चॅनल सुरू करण्‍याचा पर्याय हा सध्‍या Verified लोकांसाठी सुरू केला असून येत्‍या काही दिवसांत सर्वसामान्‍य वापरकर्त्‍यांना पण चॅनल सुरू करता येणार आहे. सध्‍या तुम्‍ही इतरांचे चॅनल मात्र जॉईन करू शकता. लवकरच सर्वांना चॅनल सुरू करण्‍याचा पर्याय दिला जाणार असल्‍याचे सांगितले जात आहे. सर्वांना चॅनल सुरू करण्‍याचा पर्याय सुरू झाल्‍यावर आम्‍ही आपणास कळवू, त्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेला Whatsapp च्‍या चिन्‍हाला क्लिक करून आमचा व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करू शकता.

सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…

error: Content is protected !!