पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लाखो लोकांसाठी पीएम विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात कार्यरत कारागिरांना 3 लाख रूपयांचे कर्ज कोणत्याही हमीशिवाय मिळणार आहे. शिवाय या कारागिरांना प्रशिक्षण सुध्दा देण्यात येणार आहे. सदरील प्रशिक्षणा दरम्यान दर दिवशी 500 रूपये भत्ता सुध्दा दिला जाणार आहे.
एवढंच नव्हे तर या कारागिरांना आधुनिक साहित्य खरेदी करण्यासाठी 15 हजार रूपये सुध्दा दिले जाणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून छोटे व्यावसायिक, कारागिर यांना आपल्या उद्योग व्यवसायात वाढ करता येईल शिवाय त्यांच्या आर्थिक स्थिती मध्ये सुध्दा सुधारणा करता येईल.
कोणाला मिळणार लाभ ?
पीएम विश्वकर्मा योजने अंतर्गत लोहार, कुंभार, चांभार, धोबी, गवंडी, माळी, मिस्त्री, विणकर, मुर्तीकार, शिल्पकार अशा विविध प्रकारचे कौशल्य असणाऱ्या जवळपास 18 प्रकारच्या कारागिरांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. गावातील CSC केंद्राच्या माध्यमातून याची नोंदणी लवकरच केली जाणार आहे.
सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर महत्वाची माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.