कोणत्‍या कारागिरांना एक लाख रूपये मिळणार ? माहिती खालील प्रमाणे….

देशातील ग्रामिण असो की शहरी असो, पारंपारिक हस्‍त कलाकार किंवा कारागिरांना अर्थसहाय्य देण्‍यासाठी मोदी सरकारने पीएम विश्‍वकर्मा योजनेला मंजूरी दिली आहे. या योजनेसाठी केंद्र सरकार 13 हजार कोटी रूपये खर्च करणार आहे. या योजने अंतर्गत पहिल्‍या टप्‍प्‍यात 18 पारंपारिक व्‍यवसायांचा समावेश करण्‍यात आला आहे.

सरकार सदरील कारागिरांना आधुनिक प्रशिक्षण सुध्‍दा देणार आहे, शिवाय या प्रशिक्षणादरम्‍यान 500 रूपये भत्‍ता पण देण्‍यात येणार आहे. सदरील कारागिरांना सरकार तर्फे प्रमाणपत्र आणि आयडी म्‍हणजेच ओळखपत्र सुध्‍दा देण्‍यात येणार आहे.

योजने अंतर्गत ज्‍या 18 प्रकारच्‍या कारागिरांना लाभ देण्‍यात येणार आहे त्‍यामध्‍ये सुतार, होडी बांधणी, कारागिर, लोहार, चिलखत बनवणारे, हातोडी किंवा अवजार संच बनवणारे, सोनार, कूलूप बनवणारे, कुंभार, शिल्‍पकार, पाथरवट, चर्मकार, मेस्‍त्री, चटया, टोपल्‍या, झाडू, कॉयर साहित्‍य कारागिर, पारंपारिक बाहुल्‍या आणि खेळणी बनवणारे, न्‍हावी, फुलांचे हार बनवणारे कारागिर, शिंपी, परीट आणि मासेमारचे जाळे विणणारे इत्‍यादी कारागिरांचा समावेश आहे.

सदरील कारागिरांना पहिल्‍या टप्‍प्‍यात फक्‍त 5 टक्‍के व्‍याजदराने 1 लाख रूपये व दुसऱ्या टप्‍प्‍यात 2 लाख रूपये कर्ज पुरवठा करण्‍यात येणार आहे. या योजने अंतर्गत या कारागिर बांधवांना प्रोत्‍साहन देवून मुख्‍य प्रवाहात आणण्‍याचा सरकारचा प्रयत्‍न आहे.

सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…

बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्‍या मोबाईलवर नेहमी मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!