नवरदेवाची भन्‍नाट कल्‍पना ! लग्‍नपत्रिका अशी छापली की नातेवाईकांच्‍या रूसव्‍या फुगव्‍याची चिंताच मिटली !

ज्‍या लग्‍नपत्रिकेची चर्चा पंचक्रोशित व सोशल मीडियावर सुरू आहे ती लग्‍नपत्रिका नगर जिल्‍ह्यात छापण्‍यात आली आहे, सदरील लग्‍नपत्रिका पाहून अनेकजण समाधान व्‍यक्‍त करत आहेत शिवाय ती लग्‍नपत्रिका जपून ठेवण्‍यासारखी असल्‍याचेही लोक सांगत आहेत. ज्‍या लग्‍नपत्रिकेची चर्चा सगळीकडे त्‍यात विशेष काय ते पाहुया…

अहमदनगर मधील जाधव आणि तांबे यांच्‍या विवाह सोहळ्याच्‍या लग्‍नपत्रिकेमध्‍ये नातेवाईकांच्‍या नावाऐवजी विविध शासकीय योजनांची माहिती छापून दोन्‍ही कुटुंबातील एक चांगला संदेश देण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. या पत्रिकेमध्‍ये पाच वेगवेगळ्या सरकारी योजनांची माहिती, त्‍याचे निकष आणि आवश्‍यक कागदपत्रांची माहिती देण्‍यात आली आहे.

सदरील योजनेमध्‍ये आयुष्‍यमान भारत योजना, मुख्‍यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, संजय गांधी निराधार योजना यासह इतर योजनांचा समावेश आहे. यासोबतच योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती, संपर्क क्रमांक देण्‍यात आले आहेत. शिवाय रूग्‍णवाहिकेचे आणि आरोग्‍य योजना राबवणाऱ्या दवाखान्‍याचे नाव आणि नंबरही देण्‍यात आले आहेत.

त्‍यामुळे सदरील लग्‍नपत्रिका नातेवाईकांसह पंचक्रोशीतील नागरिक आणि सोशल मीडियावर सुध्‍दा चर्चेचा विषय ठरत आहे. शिवाय नातेवाईकांनीही या लग्‍नपत्रिकेचे स्‍वागत केले आहे. सदरील लग्‍नपत्रिकेत असलेली माहिती महत्‍वपूर्ण असल्‍यामुळे ही पत्रिका घरात नेहमी जपून ठेवण्‍यासारखी असल्‍याचेही नातेवाईकांचे म्‍हणणे आहे.

सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा….

मित्रांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्‍या मोबाईलवर नियमित मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!