Viral Wedding Invitation Card : लग्नपत्रिका म्हटले की, त्यामध्ये कुटुंबातील सदस्यांसह असंख्य नातेवाईक, पाहुण्यांचे नाव टाकावे लागते, लग्नपत्रिकेत कितीही नावे टाकली तरी कोणी ना कोणी नाराज होतच असते, रूसवे फुगवे दिसून येतात, अनेकजण तर लग्नपत्रिकेत नाव नाही म्हणून लग्नालाच येत नाही, किंवा संबंधित कुटुंबाशी बोलणेच सोडून देतात.
एकीकडे घरात लग्न होत असल्याचा कुटुंबाला आनंद होत असतो, मात्र त्याच वेळी लग्नपत्रिका छापताना कोणाचे नाव टाकायचे आणि किती टाकायचे हा लग्नघरातील लोकांना टेंशन देणारा प्रश्न असतो. कारण नातेवाईक, पाहुणे, मित्रमंडळी, नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी असे एक ना अनेक लोक असतात, किंबहुना ही संख्या हजारातही जाईल.
Viral Wedding Invitation Card
मात्र पत्रिकेवर एवढे लोक टाकणे शक्य नसते, कारण प्रत्येकाच्या घरातील एक सदस्य टाकायचे म्हटले तरी लग्नपत्रिकेची पाने किती होतील याचा अंदाज लावता येणार नाही, त्यामुळे लग्नपत्रिका छापने हे लग्नघरातील कुटुबाला अवघड होवून बसते, या समस्येवर एका नवरदेवाने भन्नाट शक्कल लढवली आहे, त्यामुळे कोणाचे रूसवे फुगवे होणार नाही. काय केले नवरदेवाने हे वाचण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा…