सोलर पॅनलद्वारे बॅटरी चार्ज करणारे रिक्षाचे मॉडेल हे Vega कंपनीने सादर केले असून ETX नावाने सादर करण्यात आले आहे. सदरील कंपनी ही श्रीलंका येथील असून हे रिक्षा इलेक्ट्रिक प्रकारातील आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार Vega ETX ही इलेक्ट्रिक रिक्षा सुरक्षित असून पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या परवडेल अशा प्रकारचे डिझाईन करण्यात आले आहे. सदरील रिक्षाच्या छतावर देण्यात आलेले सौर पॅनल वारंवार चार्जिंग करण्याच्या टेंशनपासून मुक्त करते.
सोलर पॅनलच्या माध्यमातून बॅटरी 64 कि.मी. पर्यंत रेंज देवू शकते. विशेष म्हणजे याला घरी विजेवर चार्जिंग सुध्दा करता येते. तुर्तास श्रीलंका मध्ये हा रिक्षा सादर करण्यात आला असून लवकरच आशिया खंडातील विविध देशात हा रिक्षा लॉन्च करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. कंपनीने सध्या रिक्षाचा प्राथमिक मॉडल लॉन्च केला असून याची किंमत अधिकृतपणे जाहीर केली नाही. भारतात हा रिक्षा लॉन्च झाल्यावर याची अधिकृत किंमत जाहीर करण्यात येणार आहे.
सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर महत्वाची माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.