वन्य प्राण्यांकडून नुकसान झाल्यास तुम्ही थेट तहसिलदारांकडे तक्रार करू शकतात, किंवा वनरक्षक यांच्याकडेही तक्रार करू शकतात, परंतू तुम्हाला हे शक्य झाले नाही तर सर्वात सोपा पर्याय म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून थेट शासनाकडे तक्रार दाखल करू शकतात.
शासनाकडून सदरील तक्रारीची दखल घेवून संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पाठवले जाते, जेव्हा पंचनामा केल्यानंतर शेतकऱ्यांना थेट बँकेत भरपाई मिळते. दुसरी गोष्ट म्हणजे जर शेतकऱ्यांचे वन्यप्राण्यांमुळे नुकसान झाल्यास शक्यतो शेतकऱ्यांनी मोबाईल मध्ये नुकसानीचे फोटो काढावेत, तसेच एखादा व्हिडीओ सुध्दा काढून ठेवावा. जेणेकरून पंचनामा करतांना अधिकाऱ्यांना परिस्थिती लक्षात येईल.
वन्यप्राण्यांकडून फक्त शेती पिकांचेच नव्हे तर एखाद्या व्यक्तीवर सुध्दा हल्ला झाल्यास, जख्मी झाल्यास, अपंगत्व आल्यास किंवा मृत्यू झाल्यास सुध्दा नुकसान भरपाई मिळते. खालील लिंकद्वारे कोणते नुकसान झाले आहे, त्यानुसार तक्रार करता येते.
वन्यप्राण्यांकडून नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी खालील लिंकला क्लिक करून ऑनलाईन तक्रार दाखल करावी, शेतकरी बांधव आपल्या मोबाईल वरून सुध्दा तक्रार दाखल करू शकतात, तसेच जवळच्या CSC किंवा महा-ई-सेवा केंद्रातूनही तक्रार करू शकतात. ऑनलाईन तक्रार करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करावे.
ऑनलाईन तक्रार करण्यासाठी शासनाची वेबसाईट…
सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर महत्वाची माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.