कामगारांच्‍या मुलांना 1 लाख रूपये कसे मिळणार ? अधिक माहिती खालील प्रमाणे…

महाराष्‍ट्र शासनाने असंघटित कामगारांच्‍या मुलांच्‍या शिक्षणासाठी मोठी तरतूद केली असून मुलांना आ‍ता उच्‍च शिक्षण घेण्‍यात अडचण येणार नाही यासाठी खालील प्रमाणे तदतूर करण्‍यात आली आहे.

असंघटित कामगारांच्‍या दोन पाल्‍यांना 1 ली ते 7 वी साठी प्रतिवर्षी 2500 रूपये किंवा 8 वी ते 10 वीसाठी प्रतिवर्षी 5000 रूपये देण्‍यात येणार आहे. तसेच दोन पाल्‍यांना इयत्‍ता 10 वी व इयत्‍ता 12 मध्‍ये 50% किंवा अधिक गुण मिळाल्‍यास 10 हजार रूपये देण्‍यात येणार आहे.

दोन पाल्‍यांना इयत्‍ता 11 वी व 12 वी च्‍या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी 10,000 रूपये देण्‍यात येणार आहे. तसेच दोन पाल्‍यांना अथवा पुरूष कामगारांच्‍या पत्‍नीस पदवी च्‍या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्‍या प्रवेश, पुस्‍तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रति वर्षी 20,000/- रूपये देण्‍यात येणार आहे.

तसेच दोन पाल्‍यांना अथवा पुरूष कामगाराच्‍या पत्‍नीस वैद्यकीय पदवी अभ्‍यासक्रमासाठी रू. 1,00000 (एक लाख) व अभियांत्रिकी पदवी अभ्‍यासक्रमा करीता रू. 60,000/- देण्‍यात येणार आहे. तसेच दोन पाल्‍यांना शासनमान्‍य पदवीके करीता प्रतिवर्षी 20,000/- व पदव्‍युत्‍तर पदविकेमध्‍ये रू.25,000/- देण्‍यात येणार आहे.

या शिवाय दोन पाल्‍यांना संगणकाचे शिक्षण MS-CIT करीता शुल्‍काची प्रतिपुर्ती केली जाणार आहे. म्‍हणजेच कोर्सची फी दिली जाणार आहे. याचाच अर्थ विविध अभ्‍यासक्रमासाठी शासनाकडून तरतूद करण्‍यात आली आहे. अधिक माहितीसाठी https://mahabocw.in/ या वेबसाईटला किंवा असंघटित कामगार मंडळाच्‍या कार्यालयाशी संपर्क साधावा.

सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…

बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्‍या मोबाईलवर नेहमी मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!