आता सरकारच्‍या उमंग अॅप वरून डिजिटल 7/12 कसा डाउनलोड करायचा ?

सध्‍याचे युग हे तंत्रज्ञानाचे आणि डिजिटल युग म्‍हटले जाते, आता बऱ्याच गोष्‍टी मोबाईलवर उपलब्‍ध झाल्‍या आहेत आणि होत आहेत. आधी 7/12 साठी तलाठी कार्यालयाच्‍या चकरा माराव्‍या लागत होत्‍या, परंतू आता शासनाने 7/12 ऑनलाईन उपलब्‍ध करून दिली आहे. केंद्र सरकारनेही उमंग अॅपच्‍या माध्‍यमातून 7/12 डाउनलोड करण्‍याची सुविधा दिली आहे.

Umang अॅप कसे डाउनलोड करायचे ?

आपण Google Play Store वर गेल्‍यास तेथे सर्च बार मध्‍ये Umang असे टाईप केल्‍यास आपल्‍या समोर उमंग अॅप दिसून येईल त्‍यास आपल्‍याला Install करायचे आहे. त्‍यानंतर त्‍यास ओपन करायचे आहे.

डिजिटल 7/12 कशी डाउनलोड करायची ?

उमंग अॅप सुरू केल्‍यावर आपणास आपले अकाउंट ओपन करावे लागेल, हे अत्‍यंत सोपे आहे. मोबाईल नंबर टाकून आपण आपले अकाउंट उघडू शकता. त्‍यानंतर Login झाल्‍यावर बॉटमला असलेल्‍या All Services ला क्लिक करा. त्‍या मध्‍ये Maharashtra Land Record ऑप्‍शन दिसेल. त्‍याला क्लिक करा. यावेळी आपणास प्रथम वॉलेट मध्‍ये काही पैसे अॅड करावे लागतील. त्‍यानंतर डाउनलोड सातबारा या ऑप्‍शनच्‍या माध्‍यमातून व नाममात्र फी मध्‍ये आपण सातबारा डाउनलोड करू शकता.

सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…

मित्रांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्‍या मोबाईलवर नियमित मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!