तार कुंपण योजनेचा लाभ कसा मिळेल ? माहिती खालील प्रमाणे…

शेतीला किंवा शेत पिकांना संरक्षण देण्‍याच्‍या दृष्‍टीने शासनाने एक महत्‍वपूर्ण योजना सुरू केली आहे, सदरील योजनेचे नाव डॉ.श्‍यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास प्रकल्‍प असे असून या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना तार कुंपणसाठी 90 टक्‍क्‍यापर्यंत अनुान देण्‍यात येणार आहे.

सदरील योजना ही फक्‍त वन विकास प्राप्‍ती व्‍याघ्र प्रकल्‍पाच्‍या बफर क्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच आहे. सदरील तार कुंपण योजनेचा लाभ घेण्‍यासाठी शेतकऱ्यांना तालुक्‍याच्‍या पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधवा लागेल, आपण या योजने अंतर्गत येत असल्‍यास संबंधित अधिकारी तुम्‍हाला योजनेचा लाभ घेण्‍यासाठी लागणारी कागदपत्रे सांगतील.

तुर्तास ही योजना व्‍याघ्र प्रकल्‍पाच्‍या बफर क्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच असली तरी या भागात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा मिळणार आहे. अधिक माहितीसाठी आपल्‍या पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा. विविध योजना व इतर माहितीचे आर्टीकल खाली वाचू शकता…धन्‍यवाद…

error: Content is protected !!