सद्यस्थितीत राज्यात तलाठी पदांच्या अनेक जागा रिक्त आहेत, त्यामुळे एका तलाठ्यांकडे अनेक गावांचा कार्यभार आहे. त्यामुळे शासनाने 4644 जागांसाठी भरती सुरू केलेली आहे. लवकरच ही भरती होईल.
त्यामुळे तुर्तास तरी आजघडीला असलेल्या तलाठ्यांना इतर गावांच्या अतिरिक्त पदभारासह काम करावे लागणार आहे.
शासनाने सदरील तलाठी यांना आता नवीन आदेश काढले आहेत त्यानुसार भरती प्रक्रिया पार पडेपर्यंत संबंधित तलाठी यांनी त्यांचा नियोजित दौरा, बैठका, कार्यक्रम याबाबत तलाठी कार्यालय तसेच संबंधित गावाच्या ग्रामपंचायतच्या दर्शनी भागात दिसेल अशा ठिकाणी सूचना फलक लावावा.
तलाठ्यांनी कार्यालयाच्या दर्शनी भागात त्यांचा दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक ठळक दिसेल अशा स्वरूपात लावावा, तसेच संबंधित सज्जाचे मंडळ अधिकारी, नायब तहसिलदार यांचे नाव व दूरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांक सुध्दा दर्शविण्यात यावा. सर्वसामान्य नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.