Your Alt Text

आता तलाठ्यांना गावात उपस्थित रहावे लागणार ! गैरहजर राहील्‍यास….! सरकारने घेतला निर्णय | Talathi Presence

Talathi Presence : तलाठ्यांना मुख्‍यालयी उपस्थित राहण्‍याबाबत शासनाने महत्‍वपूर्ण आदेश दिले आहेत. आपल्‍याला माहितीच आहे की, तलाठी हे ग्रामीण भागात महत्‍वाचे पद आहे, शेतीविषयक अनेक प्रकारची कामे ही तलाठी यांच्‍या माध्‍यमातून होत असतात, मात्र तलाठी जर मुख्‍यालयी नसेल तर शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

तलाठ्यांकडे विशेष करून 7/12 वर नोंद करणे, फेरफार करणे, विहीर लावणे, बोअर लावणे, नोटीस काढणे व इतर महसूल विभागाशी संबंधित अनेक कामे ही तलाठी यांच्‍या माध्‍यमातून करावी लागतात, मात्र अनेक गावांमध्‍ये अशी परिस्थिती आहे की तलाठी यांची भेटच होत नसल्‍याची तक्रार शेतकऱ्यांकडून होत असते.

Talathi Presence in Village

तलाठी हे महत्‍वाचे पद असून विविध प्रकारच्‍या दाखल्‍यांसाठी तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो, मात्र संबंधित कार्यालयात किंवा गावात तलाठी भेटत नसल्‍यास शेतकऱ्यांना तलाठ्यांना शोधत फिरावे लागते, त्‍यामुळे शेतकरी बेजार होतात.

शासनाच्‍या सूचनेनुसार मोबाईल अॅप द्वारे ई पीक पाहणी, करणे, नुकसानीचे पंचनामे करणे, दुष्‍काळ, अतिवृष्‍टी, नैसर्गिक आपत्‍ती इत्‍यादी प्रसंगी मदत व पुनर्वसनाचे काम करण्‍याच्‍या दृष्‍टीने तलाठी हा शेतकरी व शासना मधला महत्‍वाचा दुवा असतो. परंतू तलाठी मख्‍यालयी राहत नसल्‍याच्‍या तक्रारी शासनाकडे वारंवार प्राप्‍त होत आहेत. त्‍यामुळे शासनाने एक महत्‍वपूर्ण निर्णय घेतला आहे. शासनाने काय आदेश दिले आहेत याबाबतच्‍या माहितीसाठी…. येथे क्लिक करा…..

तलाठी यांना शासनाने काय आदेश दिले आहेत ? येथे क्लिक करा….

Leave a Comment

error: Content is protected !!