सौर उर्जेवर म्हणजेच सुर्य प्रकाशावर चालणारे सोलार स्टोव्ह होय. फक्त सूर्यप्रकाशावरच नव्हे तर रात्रीच्या वेळी सुध्दा हे सोलार स्टोव्ह काम करते, कारण यात रिचार्जेबल सुविधा असते. अनेकांना प्रश्न पडतो की, स्टोव्हला सुर्य प्रकाशात ठेवावे लागेल, परंतू असे नाही, स्टोव्ह हे घरातच ठेवता येते आणि चार्जिंग करणारे युनिट सुर्यप्रकाशात ठेवावे लागते.
प्राप्त माहितीनुसार हे स्टोव्ह फक्त सौर उर्जेवरच नव्हे तर विजेवर सुध्दा चालणार आहे. सदरील कंपनीने विविध प्रकारचे 3 मॉडेल लॉन्च केले आहे. या सोलार स्टोव्ह च्या माध्यमातून एका कुटुंबातील लोकांचे 3 वेळचे जेवण बनवणे शक्य आहे.
या सोलर स्टोव्हची बेसिक मॉडलची किंमत 12000 रूपये ठेवण्यात आली असून टॉपच्या मॉडेलची किंमत 23,000/- रूपये ठेवण्यात आली आहे. भारतीय कंपनी इंडियन ऑईलच्या नुसार येत्या काळात याच्या किंमती अजून कमी होतील शिवाय सरकारही या स्टोव्हवर सबसिडी देणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात हा स्टोव्ह घेता येणार आहे.
सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.