उधार पैसे घेवून खरेदी केला 1 ट्रक ! नंतर बनला 5000 गाड्यांचा मालक ! कसे वाचा !

ज्‍या व्‍यक्‍तीकडे ट्रक घेण्‍यासाठी पैसे नव्‍हते त्‍या व्‍यक्‍तीने उधार पैसे घेवून ट्रक घेतले आणि नंतर प्रगती करत 5000 गाड्याचे मालक बनले त्‍या व्‍यक्‍तीचे नाव आहे विजय संकेश्‍वर. आज ते VRL लॉजिस्‍टीकचे मालक आहेत.

मिडीया रिपोर्टनुसार विजय संकेश्‍वर यांचे कुटुंब पुस्‍तक प्रकाशनाच्‍या व्‍यवसायाशी निगडीत होते. कुटुंबातील सदस्‍यांनीही त्‍यांना आपलाच व्‍यवसाय करावा आणि दुसऱ्या व्‍यवसायात जावू नये असे सांगितले होते, परंतू विजय संकेश्‍वर यांना नवीन काही तरी करायचे होते.

त्‍यांनी 1976 मध्‍ये कंपनीची सुरूवात केली. विशेष म्‍हणजे त्‍यांनी सुरूवातीला उधार पैसे घेवून 1 ट्रक घेतला आणि नंतर याच ट्रकच्‍या माध्‍यमातून व्‍यवसाय वाढवला, एक एक करत त्‍यांनी अनेक वाहने घेतली. आज त्‍यांच्‍याकडे 5000 व्‍यावसायिक वाहने आहेत. त्‍यांची उलाढाल कोट्यावधींची आहे, अर्थातच ते आज हजारो कोटींचे मालक आहेत.

एवढे वाहने त्‍यांच्‍याकडे असल्‍यामुळे त्‍यांचे नाव लिम्‍का बुक ऑफ वर्ल्‍ड रेकॉर्ड मध्‍ये नोंदवले गेले आहे. त्‍यांच्‍या वर आधारित एक चित्रपट सुध्‍दा निघाला आहे. त्‍यांचा प्रवास नक्‍कीच अनेकांना प्रेरणा देणारा आहे.

सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…

मित्रांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्‍या मोबाईलवर नियमित / दररोज मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

भारतात बॉलीवूड मध्‍ये बीग बी कोणाला म्‍हटले जाते ?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!