आता विजेची चिंता मिटणार आहे कारण सरकारने Solar Rooftop Subsidy Scheme सुरू केली आहे. सदरील सोलर रूफटॉप योजनेच्या माध्यमातून तुम्ही घराच्या छतावर सोलर पॅनल लावून वीज बिलातून मुक्ती मिळवू शकता.
विशेष म्हणजे सदरील योजनेसाठी सरकार अनुदान देत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना ही योजना फायद्याची ठरणार आहे. काय आहे ही योजना, त्याचा फायदा काय आणि या योजने अंतर्गत किती अनुदान मिळते इत्यादी माहिती या आर्टीकल मध्ये जाणून घेवूया.
PM Solar Rooftop Yojana
केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, सौर उर्जेला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन आणि अनुदान देण्यात येत आहे. सोलर उर्जा ही फक्त घरापुरतीच मर्यादित न राहता इतर क्षेत्रातही त्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे, उदाहरणार्थ सरकारने शेतीसाठी कुसूम सोलर पंप योजना सुरू केली आहे, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होत असून दिवसा शेताला पाणी देणे शक्य होत आहे.
PM Solar Panel Yojana
आता सरकारने घरगुती वापरासाठी सुध्दा एक नवीन योजना सुरू केली आहे ज्याचे नाव सोलर रूफटॉप योजना (Solar Rooftop Subsidy Scheme) असे आहे. या योजने अंतर्गत लावण्यात येणारे सोलर पॅनल एकदा लावल्यानंतर अनेक वर्षे वीज बिलाची चिंता राहणार नाही, म्हणजे मोफत वीज वापरता येणार आहे.
विशेष म्हणजे सोलर पॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आवश्यक तेवढी वीज तुम्ही वापरू शकता आणि अतिरिक्त म्हणजे जास्तीची निर्माण झालेली वीज तुम्ही वीज कंपनीला विकू शकता. म्हणजेच मोफत वीज सुध्दा मिळेल आणि यातून कमाई सुध्दा होईल.
Solar Rooftop Subsidy Scheme
आपल्याला माहितच आहे की, आपल्या देशात सूर्यप्रकाश दिवसभरात अनेक तास उपलब्ध असतो, आपल्याकडे उष्णकटीबंधीय वातावरण असल्यामुळे सूर्यप्रकाशाची तिव्रता जास्त असते, त्यामुळे सौर उर्जा निर्मिती करणे हा एक चांगला पर्याय आहे. सौर उर्जेचे महत्व लक्षात घेवून जगभरात या उर्जेला प्रोत्साहन दिले जात आहे. आता सरकारने जी सोलर योजना सुरू केली आहे त्याचे अनुदान किती मिळते, कुठे अर्ज करायचा या माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा…