शालेय शिक्षणमंत्री हे पुणे दौऱ्यावर असतांना त्यांनी शिक्षक भरतीच्या दृष्टीने मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, एकूण 50 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात 30 हजार तर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे. येत्या दिड महिन्यात शिक्षक भरती प्रक्रियेला सुरूवात होणार आहे.
उच्च न्यायाल्याच्या औरंगाबाद खंडपीठाने शिक्षक भरतीला स्थगिती दिली होती, त्यामुळे शिक्षक भरती लांबली, मात्र आता भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठवण्यात आली आहे, त्यामुळे शिक्षक भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे येत्या दिड महिन्यात शिक्षक भरती प्रक्रियेला सुरूवात केली जाणार आहे.
सेवा निवृत्त शिक्षकांना तात्पुरते सेवेत घेण्याबाबत त्यांनी सांगितले की, नवीन शिक्षक भरती होणाऱ्या उमेदवारांना कोणत्या जिल्ह्यात जायचे, त्याची निवड करावी लागते, त्यामुळे भरती प्रक्रिया होईपर्यंत विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपात ही निवड करण्यात आली आहे. नवीन शिक्षक भरती झाल्यानंतर त्यांची लगेच संबंधित ठिकाणी नियुक्ती होईल असेही त्यांनी सांगितले.
सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.