गेल्या अनेक वर्षांपासून सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन वाढवण्याचे शासनाच्या विचाराधीन होते, त्यानुषंगाने 2019 च्या अर्थसंकल्पात शासनाने सरपंच आणि उपसरपंच यांचे पगार म्हणजेच मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला होता, त्यानुसार सरपंच व उपसरपंच यांना पगार मिळणार आहे. खालील पगारामध्ये 75% रक्कम शासन देणार असून उर्वरित 25% रक्कम ग्रामपंचायत स्वनिधीतून देईल.
0 ते 2000 लोकसंख्येच्या गावातील सरपंचांना 3000 रूपये व उपसरपंचांना 1000 रूपये मानधन राहील. 2001 ते 8000 लोकसंख्या असलेल्या गावाच्या सरपंचाना 4000 रूपये व उपसरपंचांना 1500 रूपये मिळतील. तसेच 8001 पेक्षा जास्त लोकसंख्येच्या गाव सरपंचांना 5000 रूपये व उपसरपंचांना 2000 रूपये मानधन राहील…. धन्यवाद…. शासनाच्या इतर योजना व माहितीसाठी खालील आर्टीकल वाचू शकता…