मागील काही दशकांमध्ये खाजगीकरण किंवा कंत्राटी पध्दत सुरू झाल्यामुळे सरकारी किंवा निमसरकारी नोकऱ्यांचे प्रमाण खूप कमी झाले आहे, त्यामुळे शासकीय नोकरीसाठी काही जागा जरी निघाल्या तरी त्यासाठी लाखो अर्ज दाखल होत आहेत. मात्र संबंधित नोकरीसाठी सरकार, खाजगी कंपन्या परीक्षा फीच्या नावावाखाली कोट्यावधीची कमाई करत असल्याचे चित्र दिसत आहे.
नुकतंच राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी विधीमंडळात याच मुद्यावर आपले आक्रामक भाषण केले, जे सध्या सगळीकडे चर्चेचा विषय बनला आहे. रोहीत पवार यांनी सांगितले की, UPSC परीक्षा शुल्क 100 रूपये असते, MPSC शुल्क 350 रूपये असते, शिवाय राजस्थान सरकार फक्त 600 रूपये आकारते, मग आपल्या राज्यात केवळ तलाठी परीक्षेसाठी ओपनसाठी 1000 रूपये आणि कॅटेगरी मधील उमेदवारांसाठी 900 रूपये का घेतले जातात असा सवाल उपस्थित केला.
राज्यात तलाठी पदासाठी 4644 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले होते, यासाठी 12 लाख 77 हजार 100 अर्ज आले, ज्याची एकूण रक्कम 127 कोटी रूपये होते. मग आपण का धंदा करायला बसलो आहोत का ? असा सवाल रोहीत पवार यांनी केला. राज्यातील तरूण तरूणींना दिलासा देण्याऐवजी कोट्यावधी रूपये त्यांच्या खिशातून काढले जात आहेत आणि खाजगी कंपन्यांचे खिसे भरले जात आहेत अशी तिव्र भावनाही त्यांनी व्यक्त केली.
आमदार रोहीत पवार यांनी राज्यातील तरूण तरूणींच्या मनातील भावना आक्रामक स्वरूपात मांडल्यामुळे तरूण त्यांना धन्यवाद देत आहेत. शिवाय त्यांचे भाषण सर्वत्र चर्चेचा विषय ठरले असून सोशल मीडियावर शेअर केले जात आहे.
सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.