Redmi Note 13 Pro : रेडमी कंपनी सातत्याने नवनवीन स्मार्टफोन लॉन्च करत असते, मागील काळात सर्वात जास्त स्मार्टफोन विक्री करण्याचा विक्रम सुध्दा याच कंपनीने केला होता, Xiomi Redmi ही कंपनी नेहमीच इतरांपेक्षा स्वस्तात स्मार्टफोन लॉन्च करत असते. मात्र यावेळी रेडमी कंपनीने लॉन्च केलेल्या स्मार्टफोनमुळे इतर कंपन्यांचे डोके हँग झाले असेल असेच म्हणता येईल.
Redmi कंपनीने Redmi Note 13 Pro आणि Redmi Note 13 Pro+ या सिरीजचे मोबाईल लॉन्च केले आहे. या मोबाईल मध्ये अनेक जबरदस्त सुविधा देण्यात आल्या आहेत ज्या इतर कंपन्यांच्या कदाचित 50 हजाराच्या मोबाईल मध्ये सुध्दा असणार नाहीत.
Redmi Note 13 Pro smartphone
सदरील रेडमीच्या स्मार्टफोन मध्ये सर्वात भारी सुविधा म्हणजे यामध्ये 200 Megapixel चा कॅमेरा देण्यात आला आहे. सध्या मार्केट मध्ये 50 MP किंवा अपवादाने जास्तीत जास्त 100 MP कॅमेऱ्याचे मोबाईल दिसून येतात. परंतू रेडमीने थेट 200 MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च करून इतर सर्व प्रमुख कंपन्यांना धक्का दिल्याचे सांगण्यात येत आहे.
एवढंच नव्हे तर रेडमीच्या या स्मार्टफोन मध्ये 16 MP चा सेल्फी कॅमेरा सुध्दा देण्यात आला आहे. तसेच 8GB रॅम आणि 128 GB इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. शिवाय यात स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आला आहे. 5100 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. सदरील बॅटरी 67 वॉट फास्ट चार्जिंगसह देण्यात आल्यामुळे अवघ्या काही मिनिटात मोबाईल चार्ज होणार आहे.
Redmi Note 13 Pro
Redmi Note 13 Pro ची स्क्रीन साईज 6.67 inch देण्यात आली आहे. ज्यावर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देण्यात आला आहे. Redmi Note 13 Pro मध्येच कंपनीने अजून 8 मॉडेल लॉन्च केले आहेत. या मॉडेलची माहिती आणि हे स्मार्टफोन कुठे व कसे मिळतील या माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा.