Realme C53 : दिवसेंदिवस मोबाईल कंपन्यांमध्ये स्पर्धा पहायला मिळत आहे. भारतात जगभरातील विविध कंपन्या आपले मोबाईल भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत आहेत, विशेष म्हणजे सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारे मोबाईल लॉन्च करण्यावर कंपन्या भरत देत आहेत.
भारतात प्रमुख कंपन्यांपैकी एक असलेली आघाडीची Smartphone कंपनी रिअलमी ने Realme C53 हा मोबाईल लॉन्च केला आहे, 108 मेगा पिक्सेल कॅमेरा असलेला हा मोबाईल खूपच स्वस्त असून त्याच्या विक्रीलाही सुरूवात झाली आहे, फक्त कॅमेराच नव्हे तर इतरही अनेक फिचर्स या मोबाईल मध्ये आपल्याला पहायला मिळतील.
Realme C53 Specification
कंपनीने लॉन्च केलेल्या Realme C53 फोन मध्ये 1600 x 720 पिक्सेलचे रिझोल्यूशन असून 6.74 इंचचा डिस्प्ले देण्यात आला आहे. रॅमच्या बद्दल बोलायचे झाल्यास 4 GB आणि 6GB दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. शिवाय अंतर्गत स्टोरेज 128 GB आहे. ज्याला मेमरी कार्ड द्वारे 2 TB पर्यंत वाढवता येईल.
मोबाईल मध्ये 108 मेगा पिक्सेलचा मुख्य कॅमेरा असून फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे. मोबाईल मध्ये 5000 mah बॅटरी देण्यात आली असून 18w फास्ट चार्जिंग करता येणे शक्य आहे. चार्जिंगसाठी usb C पोर्ट देण्यात आला आहे. मोबाईल मध्ये कॉल रेकॉर्डिंगची पण सुविधा आहे.