आता रेशनकार्ड मिळणार ऑनलाईन ! मोबाईलवरून करा अर्ज ! ही आहे वेबसाईट !

शासनाने विविध सेवा ऑनलाईन देण्‍यास सुरूवात केली असून आता त्‍यामध्‍ये रेशनकार्डचा समावेश करण्‍यात आला आहे. आता लोकांना घरबसल्‍या रेशनकार्डसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्‍यासाठी कुठेही चकरा मारण्‍याची आवश्‍यकता नाही.

ऑनलाईन अर्ज करण्‍यासाठी https://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. या वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करावा लागेल, अर्ज केल्‍यानंतर तो अर्ज तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेत पडताळणी केला जाणार आहे, पडताळणी झाल्‍यावर ऑनलाईनच रेशनकार्डची प्र‍त लाभार्थ्‍यांना दिली जाणार आहे.

एकंदरीत नवीन रेशनकार्डसाठी ऑनलाईन सेवा उपलब्‍ध झाल्‍यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. रेशनकार्डसाठी नागरिकांना कोणत्‍याही कार्यालयाच्‍या चकरा माराव्‍या लागणार नाही. फक्‍त शासनाने सदरील वेबसाईट व्‍यवस्थित सुरू ठेवावी म्‍हणजे त्‍यात तांत्रिक अडचण येणार नाही याची काळजी घ्‍यावी एवढीच अपेक्षा नागरिकांकडून व्‍यक्‍त होत आहे.

सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…

मित्रांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्‍या मोबाईलवर नियमित मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!