Rajaram Tripathi Farmer : मनात जिद्द आणि काही तरी नवीन करण्याची इच्छा असेल आणि आधुनिक पध्दतीने योग्य ते नियोजन करून मेहनत घेतल्यास यश नक्कीच मिळत असते. मग आपल्या समोर कितीही संकट असो किंवा कितीही अडचणी असो, त्यातून कालांतराने का असेना मार्ग निघत असतो. अशीच एक यशोगाथा समोर आली आहे.
एका शेतकऱ्याने शेतीतून यशस्वी तर झालाच मात्र त्यासोबत 400 पेक्षा जास्त आदीवासी बांधवांना रोजगारही मिळून दिला आहे. आपणास आश्चर्य वाटेल की, सदरील शेतकरी बांधवाची वार्षिक उलाढाल 25 कोटी आहे. विशेष म्हणजे हा शेतकरी या पूर्वी बँक मध्ये नोकरी सुध्दा होता, मात्र नोकरी सोडून हा माणूस शेतीकडे वळला.
Rajaram Tripathi Farmer success Story
विशेष म्हणजे ज्या भागात हा शेतकरी बांधव शेती करत आहे तो जिल्हा नक्षलग्रस्त आहे. या शेतकरी बांधवाने शेतातून एवढी प्रगती केली आहे की आता तो शेतकरी 7 कोटीचे हेलिकॉप्टर खरेदी करणार आहे. कोण आहे हा शेतकरी आणि त्याने कशी साधली प्रगती आणि शेतात कोणते पीक घेतले याबाबतची अधिक माहिती आता पाहुया…
7 कोटींचे हेलिकॉप्टर खरेदी करणारा व 25 कोटींची उलाढाल करणारा शेतकरी कोण ?
आपण छत्तीसगढ या राज्याचे नाव अनेकदा ऐकले असेल, या राज्यात बस्तर जिल्ह्यात कोंडागाव आहे, येथे प्रगतिशिल शेतकरी राजाराम त्रिपाठी राहतात, हा शेतकरी बांधव यापूर्वी बँकेत नोकरी करत होता, परंतू या शेतकरी बांधवाचे नोकरीत मन रमले नाही आणि त्यानी शेती करण्याचा निर्णया घेतला.
सदरील शेतकरी बांधवाचे नाव राजाराम त्रिपाठी आहे. आता आपणास प्रश्न पडला असेल की, कोणत्या पिकाच्या माध्यमातून हा शेतकरी कोट्यावधी रूपये कमावतो आहे तर याचे उत्तर आहे काळी मिरी, पांढरी मुसळी आणि स्ट्रोविया याच पिकाच्या माध्यमातून त्यांचे नाव जिल्ह्यात नव्हे, राज्यात नव्हे तर विदेशात सुध्दा प्रसिध्द झाले आहे.
राजाराम त्रिपाठी हे पांढरी मुसळी आणि काळी मिरीचे उत्पादन घेवून त्याला विदेशात विक्री करतात, विशेष करून युरोप आणि अमेरिक देशांमध्ये त्यांचा माल जातो, राजाराम हे सेंद्रीय पध्दतीने शेती करतात, भारत सरकारकडून त्यांना तीन वेळा सर्वोत्कृष्ट शेतकरी हा पुरस्कार देखील मिळाला आहे.
त्यांची वार्षिक उलाढाल 25 कोटीपेक्षा जास्त असून आता ते 7 कोटींचे R-44 हे हेलिकॉप्टर सुध्दा घेणार आहेत, त्याची बुकिंत सुध्दा त्यांनी केली असून लवकरच त्यांच्याकडे हा हेलिकॉप्टर येणार आहे. राजाराम हे सध्या 1 हजार एकरची सामुहिक शेती करत असून सदरील हेलिकॉप्टर ते अशा प्रकारे बनवून घेत आहे ज्याच्या माध्यमातून शेतात फवारणी सुध्दा करता येणार आहे. त्यांची ही यशोगाथा नक्कीच अनेकांना प्रेरणा देणारी आहे.
सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.