Proposed New Districts in Maharashtra : महाराष्ट्रात आता 22 नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात 22 नवीन जिल्हे निर्माण करण्याबाबत मागणी होत होती. सध्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत यापैकी अनेक जिल्ह्यांचे विभाजन करून त्यात 22 नवीन जिल्ह्यांची भर पडणार आहे. आधीच्या तुलनेत लोकसंख्याही बरीच वाढली आहे.
गेल्या अनेक वर्षात जिल्ह्यांचे विभाजन झालेले नाही, लोकसंख्या आणि भौगोलिक क्षेत्र व जिल्हा मुख्यालयापासून लांब असणाऱ्या नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेवून जिल्ह्याचे विभाजन व्हावे अशी मागणी सातत्याने होत असते. यापूर्वीचा इतिहास पाहिल्यास 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती.
राज्याची स्थापना झाली त्यावेळी 26 जिल्हे होते, मात्र त्यानंतर लोकसंख्या वाढली तसेच क्षेत्रफळाच्या दृष्टीनेही अनेक जिल्हे मोठे असल्याने प्रशासकीय कामानिमित्त सर्वसामान्य नागरिकांना मुख्यालयी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे अवघ झाले होते, त्यामुळे टप्प्या टप्प्याने 10 नवीन जिल्हे निर्माण करण्यात आले होते.
Proposed New Districts in Maharashtra
राज्यात आजच्या घडीला असे अनेक जिल्हे आहेत जे अनेक किलोमिटर पसरलेले आहेत, विशेष करून ग्रामीण भागात जिल्ह्याच्या ठिकाणी जायचे म्हटले की, ये-जा करण्यात पूर्ण दिवस घालवावा लागतो, म्हणजेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. शिवाय प्रशासकीय यंत्रणेलाही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यात अडचणी येतात. त्यामुळे नवीन जिल्हे निर्माण होणे आवश्यक आहे. आता नवीन झालेल्या सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. काय आहे निर्णय आणि कोणते 22 नवीन जिल्हे होणार यासाठी खालील लिंकला क्लिक करा…