मोदी सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत त्यापैकीच एक म्हणजे Pradhan Mantri Matru Vandana Yojana ही योजना आहे. सदरील प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे, या योजनेचा लाभ कोणाला घेता येईल ? योजनेसाठी निकष काय ? यासाठी इतर माहिती आपणास या आर्टीकल मध्ये मिळतील.
केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, वेळोवेळी विविध घटकातील नागरिकांसाठी योजना सुरू करत असते, या योजनांच्या माध्यमातून विविध घटकांतील नागरिकांना लाभ देण्याचा प्रयत्न केला जातो. आता केंद्र सरकारने महिलांना मदत करण्याच्या दृष्टीने सदरील PMMVY योजना सुरू केली आहे. ज्यामुळे सदरील महिलांना काही अंशी का असेना लाभ होणार आहे.
महिलेला 5000 रूपये कसे मिळणार ? येथे क्लिक करा…
केंद्रीय महिला व बाल विकास विभागाने मिशन शक्ती मार्गदर्शक सुचनेनुसार प्रधानमंत्री मातृ वंदना सुरू केली आहे. सदरील योजनेचा लाभ गरोदर महिला व स्तनदा मातांना दिला जातो. सदरील योजने अंतर्गत या महिलांना 5000 रूपयांची मदत केली जाते. राज्य सरकार किंवा केंद्र सरकार मध्ये कर्मचारी असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही.