आम्ही येथे तुम्हाला 4 प्रकारच्या सोलर जनरेटरची माहिती देत आहोत. तिन्ही मध्ये कमी अधिक सुविधा आहेत, शिवाय किंमतीतही फरक आहे. सर्वबाजूने तुम्ही चेक करून जर तुम्हाला ते आवडल्यास तुम्ही घेण्याचा विचार करू शकता, चला या सोलर जनरेटरचे मॉडेल आणि किंमत पाहुया…
1) SARRVAD Portable Solar Power Generator S-150
सदरील सोलर पावर जनरेटर मध्ये 42000 mah 155wh पोर्टेबल जनरेटरची शक्ती प्रदान करते, या जनरेटरच्या माध्यमातून तुम्ही फोन, टेब्लेट, लॅपटोप, हॉलिडे लाईट, मिनी पंखे, टीवी इत्यादी चालवू शकता. याची किंमत हे आर्टीकल लिहीत असतांना 19,000/- आहे. अधिक माहिती ऑनलाईन साईटवर पाहू शकता.
2) SARRVAD Portable Solar Power Generator ST-500
हे सोलर पावर जनरेटर जास्त पावरचे आहे, यामध्ये तुम्ही फोन, लॅपटॉप, हॉलीडे लाईट, रेडीयो, मिनी फॅन, टीवी, प्रोजेक्टर इत्यादी चालवू शकता. याची किंमत आर्टीकल लिहीत असतांना 52,000/- आहे. अधिक माहिती ऑनलाईन साईटवर पाहू शकता.
3) Ambrane 200W Portable Power Station Generator
या जनरेटरची बॅटरी 60,000 mah ची आहे. छोट्या डिव्हाईससाठी हे उपकरण आहे. यामध्ये फोन, लॅपटॉप, मिनी फॅन, लॅपटॉप, वायफाय रूटर, इत्यादी चालू शकते, याची किंमत आर्टीकल लिहीत असतांना 14,999/- आहे. अधिक माहिती ऑनलाईन साईटवर पाहू शकता.
सदरील सोलर जनरेटर व्यतिरिक्त तुम्ही इतर पर्यायही अमेझॉनवर शोधू शकता, शक्यतो सोलर जनरेटर सोबत सोलर पॅनल येत नाही, एखाद्या जनरेटर सोबत येत असतील तर ते तुम्ही चेक करू शकता, म्हणजेच सोलर जनरेटर + सोलर पॅनल एकत्र येत असतील तर चेक करू शकता.
सोलर जनरेटर च्या बहुतांश मॉडेल मध्ये शक्यतो सोलर चार्जिंग सोबतच लाईट वर सुध्दा चार्जिंग करण्याची सुविधा असते म्हणजेच ही एक चांगली सुविधा म्हणावी लागेल. सदरील सोलर जनरेटर हे अत्यंत छोटे असून उदाहरणार्थ 5 लिटर तेलाची कॅन जेवढी असते कदाचित त्यापेक्षाही छोटे असेल. वरील सोलर जनरेटर घेण्याआधी अमेझॉन किंवा इतर वेबसाईटवर गेल्यावर संबंधित जनरेटरची योग्य ती माहिती घेवूनच स्वत:च्या जबाबदारीवर निर्णय घेवू शकता.
सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.