जन्‍मानंतर मुलाला स्विकारण्‍यास वडीलांचा नकार ! आईचे पाय धुवून पिणारा हा मुलगा नंतर बनला बॉलीवूडचा सुपरस्‍टार !

या मुलाचा जन्‍म 21 डिसेंबर 1963 मध्‍ये झाला होता, त्‍याच्‍या आईचे नाव निर्मला देवी होते, आई एक गायक पण होती, तर वडील चित्रपट सृष्‍टीशी संबंधित होते. हा मुलगा दूसरा कोणी नसून गोविंदा आहे. गोविंदाची आई गर्भवती असतांनाच तिने साध्‍वी बनण्‍याचा निर्णय घेतला, म्‍हणजेच गोविंदाचा जन्‍मही झाला नव्‍हता, या काळात गोविंदाचे आई वडील जवळ असतांनाही दोघांमध्‍ये अंतर निर्माण झाले. आईने पतीशी थोडे दूर राहणे पसंत केले, ज्‍यामुळे पती नाराज राहू लागला. गोविंदाच्‍या वडीलांना वाटत होते गर्भवती राहील्‍यानंतरच गोविंदाच्‍या आईने साध्‍वी बनण्‍याचा निर्णय घेतला.

गोविंदाचा जन्‍म झाल्‍यानंतर त्‍याच्‍या वडीलांनी प्रथम त्‍यास स्विकारण्‍यास नकार दिला, परंतू नंतर त्‍याचा स्विकार केला. मात्र या काळात गोविंदाकडे आईचेच जास्‍त लक्ष होते, गोविंदा आपल्‍या आईवर खूप प्रेम करत होता, चित्रपटात काम करण्‍याबाबत आईची इच्‍छा नव्‍हती परंतू गोविंदाला चित्रपटात काम करण्‍याची खूप इच्‍छा होती, शेवटी त्‍याच्‍या प्रयत्‍नाला यश आले आणि त्‍याचा डांस पाहून एका निर्मात्‍याने त्‍याला चांस दिला, त्‍याला चित्रपटात काम मिळाले आणि मग त्‍याने मागे वळून पाहीले नाही.

जे चित्रपट निर्माते सुरूवातीला त्‍याला बोलण्‍यास तयार नव्‍हते ते त्‍याला आपल्‍या चित्रपटात घेण्‍यास उत्‍सुक राहू लागले, गोविंदाने राजाबाबू, आंटी नंबर 1, हिरो नंबर 1, हद करदी आपने, नसीब, दुल्‍हेराजा, कुली नंबर 1 असे एक ना अनेक चित्रपट गोविंदाने अजरामर केले.

जेव्‍हा गोविंदाला चित्रपटात केल्‍यामुळे पहिल्‍यांदा पैसे मिळाले तेव्‍हा त्‍याने आईसाठी साडी आणि मिठाई आणली. गोविंदा आईच्‍या वाढदिवशी आईचे पाय धुवून पीत असे. गोविंदा आपल्‍या आईला खूप मानत होता. गोविंदाची पत्‍नीही गोविंदाचे आईवर खूप प्रेम होते हे मान्‍य करते…. धन्‍यवाद….

खरं तर हा ब्‍लॉग सरकारी योजना व इतर माहितीसाठी आहे परंतू गोविंदा बद्दल असलेली माहिती शेअर करावीसी वाटली म्‍हणून हा आर्टीकल येथे पोस्‍ट केला आहे. बाकी आपल्‍या योजना व माहिती नियमितपणे आपणास या ब्‍लॉग‍वर मिळतील… धन्‍यवाद….

सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…

मित्रांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्‍या मोबाईलवर नियमित मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!