पोलीस खात्‍यात खालपासून वर पर्यंत कोणती पदे असतात ?

तसं तर पोलीस विभागात इतर विभागासारखेच सहायक असणारी अनेक पदे असतात, मात्र आपण सामान्‍यत: क्रमवारी नुसार महत्‍वाची असलेली पदे येथे देत आहोत.

  • पोलीस महासंचालक
  • अतिरिक्‍त महासंचालक
  • विशेष पोलीस महानिरीक्षक
  • पोलीस उपमहानिरीक्षक
  • सहाय्यक महानिरीक्षक
  • पोलीस अधिक्षक
  • अतिरिक्‍त पोलीस अधिक्षक
  • पोलीस उपअधिक्षक
  • वरिष्‍ठ पोलीस निरीक्षक
  • पोलीस निरीक्षक
  • सहायक पोलीस निरीक्षक
  • पोलीस उपनिरीक्षक
  • सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
  • पोलीस हवालदार
  • पोलीस नाईक
  • पोलीस शिपाई

अशी विविध पदे असतात, या व्‍यतिरिक्‍तही अनेक पदे असतात, जसे की, महानगर असलेल्‍या शहरांमध्‍ये पोलीस आयुक्‍त हे पद असते. तसेच ते शहर सोडून जिल्‍ह्यातील ग्रामीण भागासाठी ग्रामीण पोलीस अधिक्षक हे पद सुध्‍दा असते. एवढंच नव्‍हे तर गृह विभागाचे मंत्री हे प्रमुख असतात अर्थात गृहमंत्री असतात, आणि या विभागात गृहसचिव हे सुध्‍दा प्रमुख पद असते.

सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…

मित्रांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्‍या मोबाईलवर नियमित / दररोज मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!