प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही योजना गरोदर महिला आणि स्तनदा मातांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून त्यांना 5000 रूपयांची मदत केली जाते. सदरील योजनेचा पहिला हप्ता अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य केंद्रात गर्भधारणेची नोंदणी करण्यासाठी 1000 रूपयांची मदत मिळते.
गर्भधारणेच्या 6 महिन्यानंतर 2000 चा दुसरा हप्ता दिला जातो. तसेच बाळाच्या नोंदणी आणि लसीकरणाच्या वेळी 2000 चा तिसरा हप्ता दिला जातो. सदरील योजनेचा लाभ घेण्यासाठी अंगण्वाडी केंद्र किंवा आरोग्य केंद्राला भेट देवून अधिक माहिती घेवू शकता.
लाभार्थी महिलेला स्वत:ची संमतीपत्र द्यावे लागते, मोबाईल नंबर जो आधारकार्डशी लिंक असेल असा द्यावा लागतो, बँक खात्याचा तपशील द्यावा लागतो, माता बाल संरक्षण कार्ड (MPC card) इत्यादी कागदपत्र लागतात. अधिक माहितीसाठी अंगण्वाडी केंद्र किंवा नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधता येईल.
सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…
मित्रांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नियमित मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.