केंद्र सरकार शेतकऱ्यांना पीएम किसान योजने अंतर्गत मिळणाऱ्या 2000 च्या हप्त्यात वाढ करू शकते अशी माहिती समोर आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका माध्यमाला दिलेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेच्या रक्कमेत वाढ करण्याबाबत प्रस्ताव प्रधानमंत्री कार्यालयास सादर करण्यात आला आहे.
सदरील प्रस्तावास जर मंजूरी मिळाली तर सरकारला वर्षाला 20 ते 30 हजार कोटी रूपये अतिरिक्त खर्च येवू शकतो. सदरील प्रस्तावानुसार शेतकऱ्यांना 2000 ऐवजी 3000 चा मिळेल म्हणजेच वर्षाला 9000 रूपये मिळू शकतात. सदरील प्रस्तावाबाबत किंवा निर्णयाबाबत सरकारकडून अधिकृतपणे कोणत्याही प्रकारची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र माध्यमांमध्ये माहिती समोर येत आहे.
एवढंच नव्हे तर सरकार एमएसपी बाबतही निर्णय घेणार असल्याचे समोर येत आहे. म्हणजेच MSP वर अधिक धान्य खरेदी करण्याची योजना आखली जात आहे. शिवाय पेट्रोल डिझेल आणि एलपीजी याबाबतही सरकार निर्णय घेवू शकते अशी माहिती समोर येत आहे. अर्थातच सरकारने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र माध्यमांमध्ये याबाबत माहिती समोर येत आहे.
सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.