Pawar Formula for Crops : शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण इंजिनिअर असलेल्या एका शेतकरी पुत्राने एक भन्नाट संशोधन केले आहे ज्यामुळे पिकांना 2 महिने पाणी नसेल तरीही पिकांची वाढ होणार आहे अर्थात पिके तग धरू शकणार आहेत. विशेष म्हणजे सदरील संशोधनाला सरकारकडून पेटेंट सुध्दा मिळाले आहे.
वारंवार शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागतो, अनेक भागात पाण्याची समस्या असते, अनेकदा तर दुष्काळासारखी परिस्थिती सुध्दा जाणवते. कमी पाण्याअभावी पिके सुकून जाण्याची शक्यता असते, अनेकदा तर पाण्याअभावी पिके गेल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होते. मात्र आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
आपणास विश्वास बसणार नाही, परंतू इंजिनिअर असलेल्या शेतकरी पुत्राने एक भन्नाट संशोधन केले आहे. यासंशोधनानुसार पीक लागवड केल्यानंतर दोन महिन्यापर्यंत पिकाला पाणी नाही मिळाले तरी देखील पीक तग धरू शकणार आहे अर्थात पीकांची वाढ होणार आहे. विशेष म्हणजे या संशोधनाला सरकारचे पेटेंट सुध्दा मिळाले आहे.
सदरील संशोधन हे जळगांव जिल्ह्यातील प्रकाश पवार या शेतकरी पुत्राने केले आहे. प्रकाश सुनिल पवार यांचे शिक्षण BE Mechanical असून त्यांनी केलेल्या या संशोधनाला 20 वर्षांसाठी पेटेंट सुध्दा मिळाले आहे.
Pawar Formula for Crops
सदरील संशोधनामध्ये एक नवीन हायड्रोजेल फॉर्म तयार केला असून तो पूर्णपणे स्टार्च मटेरियल पासून तयार करण्यात आला आहे. यामध्ये मक्याच्या पावडरचा वापर करण्यात आला असून हा फॉर्मुला प्रयोगशाळेत देखील टेस्ट करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
एवढंच नव्हे तर वनविभागाच्या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सुकलेल्या झाडांसाठी या फॉर्मुल्याचा वापर केला असता एक ते दिड महिन्यानंतर ही संपूर्ण सुकलेली झाडे हिरवीगार झाली आहेत. सदरील पावडर कसे वापरावे लागते आणि त्याची किंमत किती आहे या माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा…