पंजाबराव डख यांनी नुकतीच 40 लाखांची फॉर्च्यूनर गाडी घेतली आहे, त्यामुळे सोशल मीडियावर ते सध्या चर्चेत आहेत. पंजाबराव डख यांचे समर्थक आणि विरोधक यांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत. मात्र गाडी घेण्यासाठी 40 लाख रूपये कोठून आले या प्रश्नाचे उत्तर स्वत: पंजाबराव डख यांनीच दिले आहे.
नुकतंच पंजाबराव डख यांची एका वृत्तवाहिनीवर मुलाखत प्रकाशित झाली आहे, त्यामध्ये त्यांना 40 लाखांची फॉर्च्यूनर का घेतली व त्यासाठी पैसे कोठून आले असा प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर गाडी घेण्याचे कारण सांगितले की, 5 वर्षाच्या काळात 14 हजाराहून अधिक गावांना त्यांनी भेटी दिल्या आहेत, दिवसातील 12 ते 16 तास ते गाडीतच असतात. म्हणजेच जवळपास 16 तास त्यांना प्रवास करावा लागतो.
गावांना भेटी, शेतकरी मेळावे, इतर कार्यक्रमांना ते उपस्थित राहून शेतकऱ्यांना हवामान अंदाज देत असतात. हजारो कि.मी.चा प्रवास करावा लागत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, याआधी ते बोलेरो गाडीने प्रवास करीत होते, मात्र या गाडीला एकच एअर बॅग असते.
त्यांचा इनोव्हा गाडी घेण्याचा विचार होता, परंतू त्या गाडीला ग्राउंड क्लिअरंस खूपच कमी आहे. शेवटी पंजाबराव डख यांनी त्यांच्या आरटीओ मित्राशी चर्चा केली व त्यांच्या सूचनेनुसार पंजाबराव डख यांनी फॉर्च्यूनर गाडी घेण्याचे ठरवले, कारण या गाडीत 7 एअरबॅग असतात.
गाडी घेण्यासाठी पैसे कोठून आले ?
पंजाबराव डख यांनी तब्बल 40 लाखांची फॉर्च्यूनर गाडी घेतली, मात्र त्यांच्याकडे एवढे पैसे कोठून आले ? त्यांनी ही गाडी कोणी गिफ्ट केली होती का ? कंपनीकडून त्यांना काही मिळाले का ? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते, मात्र यावरही त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिले. मी कोणाकडूनच पैसे घेतले नाही.
पंजाबराव डख यांनी या पैशाबाबत सांगितले की, दर वर्षी मला सव्वाशे क्विंटल सोयाबीन व सव्वाशे क्विंटल हरभऱ्याचे उत्पादन होते, या शेतीतूनच मिळणाऱ्या पैशातूनच त्यांनी पैसे जमवले आणि फॉर्च्यूनर गाडी घेतली. गाडी घेण्याचे पुन्हा एक कारण म्हणजे त्यांच्या धर्मपत्नीने चांगल्या आणि सुरक्षित गाडीनेच प्रवास करा नसता प्रवास करू नका असे स्पष्ट सांगितले होते, त्यामुळे फॉर्च्यूनर गाडी घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवाय शेतकरी मेळाव्यांसाठी पंजाबराव डख हे पैसे घेतात का ? यावरही त्यांनी सांगितले की, प्रवासासाठी लागणारा खर्च आणि नाममात्र मानधन ते स्विकारतात. मात्र हे पैसे प्रवासासाठीच खर्च होतात, अतिरिक्त पैसे कोणाकडूनही घेत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सदरील गाडी ही स्वत:च्याच पैशाने घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.