कोणत्‍या तारखेला चांगला पाऊस पडणार ? माहिती खालील प्रमाणे….

प्रसिध्‍द हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, शेतकऱ्यांनी चिंता करू नये, यापुढील काळात चांगला पाऊस पडणार आहे. काही भागात तर मुसळधार पाऊस पडणार असून नदी नाले भरून वाहतील अशी परिस्थिती होणार आहे.

पंजाबराव डख यांनी सांगितल्‍याननुसार येत्‍या 17 तारखेपासून पावसाला सुरूवात होणार आहे. सुरूवातीला पूर्व विदर्भात पावसाची तिव्रता वाढलेली पहायला मिळणार आहे. 17 ते 22 ऑगस्‍ट दरम्‍यान राज्‍यातील विदर्भ, मराठवाडा, मध्‍य महाराष्‍ट्र आणि कोकणात पाऊस पसरणार आहे. सदरील कालावधीत राज्‍यातील जवळपास सर्वच भागात पाऊस होण्‍याची शक्‍यता आहे.

तसेच 25 ते 30 ऑगस्‍ट दरम्‍यानही राज्‍यात जोरदार पाऊस पडणार आहे. म्‍हणजेच 17 ते 30 ऑगस्‍ट पर्यंत राज्‍यातील सर्वच भागात पाऊस पडणार आहे. दरम्‍यानच्‍या काळात राज्‍यातील नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, नांदेड, हिंगोली, परभणी, बुलढाणा, बीड, पंढरपूर, सातारा, सांगली, उस्‍मानाबाद, सोलापूर, अहमदनगर, जळगांव, नाशिक या भागात जास्‍त पाऊस पडणार आहे.

एकंदरीत राज्‍यातील 17 ते 30 ऑगस्‍ट दरम्‍यान राज्‍यातील जवळपास सर्वच जिल्‍ह्यात कमी अधिक प्रमाणात भाग बदलत पाऊस होणार आहे. काही भागात तर नदी नाले ओसंडून वाहतील एवढा पाऊस पडणार आहे. त्‍यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये असे आवाहन पंजाबराव डख यांनी केले आहे.

सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…

बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्‍या मोबाईलवर नेहमी मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!