Opinion on Rural Development : वर्षानुवर्षे गावाचा सर्वांगिण विकास का होत नाही ? असा प्रश्न अनेकांना पडतो. कारण आजही अपवाद सोडल्यास बहुसंख्य गावांची अवस्था जैसेथेच दिसून येते, आजही अनेक गावांमध्ये पिण्याची पाण्याची सोय नाही, हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते किंवा विकतचे पाणी घ्यावे लागते किंवा इतरांच्या दारात पाण्यासाठी जावे लागते.
स्वच्छतेच्या बाबतीत म्हणायचे झाल्यास जिकडे तिकडे कचरा, घाण व दुर्गंधी पसरलेली दिसून येते, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते, कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी खात्रीलायक अशी यंत्रणा दिसून येत नाही, अर्थात कचरा आजही रस्त्याच्या कडेला दिसून येतो. पर्याय नसल्याने लोकही जिथे दिसेल तेथे कचरा टाकतात.
Opinion on Rural Development
गावात अनेक गल्ल्यांमध्ये नाल्याच नाहीत, जेथे आहे तेथील नाल्यांमधील पाणीच पुढे जात नाही. गावातील अनेक वार्ड असे आहेत जेथे अजूनही सिमेंट रस्ताच नाही, त्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात चिखलातून ये-जा करावी लागते. सरकारी योजना फक्त ऐकायलाच मिळतात, मात्र त्याचा लाभ मिळत नाही. याला जबाबदार कोण ? तुमचं मत नोंदवण्याठी खालील लिंकला क्लिक करून पुढे एक पान उघडेल त्यावर तुमचं मत नोंदवा.