ओबीसींसाठी घरकुल देण्याबाबत यापूर्वी घोषणा करण्यात आली होती, शिवाय यापूर्वीच मंत्रिमंडळाने त्यास मंजूरी सुध्दा दिली होती, आता जीआर निघाल्यामुळे ओबीसींना घरकुल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ओबीसींसाठी 10 लाख घरे उपलब्ध होणार असून यासाठी राज्य शासनाला 12,000 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे.
सदरील ओबीसींसाठी असलेली योजना ग्रामविकास विभागाकडून राबवली जाणार असून यासाठी निधी इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून पुरवठा जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सदरील नागरिक महाराष्ट्रात किमान पंधरा वर्षे वास्तव्य करणारा असावा. या योजने अंतर्गत पक्के घर नसलेल्या लोकांना लाभ दिला जाणार आहे.
ज्या नागरिकांना आधी घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही अशा नागरिकांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत घर बांधण्यासाठी 1 लाख 20 हजार रूपये अनुदान दिले जाणार आहे. कच्चे घर असलेल्या व स्वत:ची जागा असलेल्या ओबीसी नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. येत्या तीन वर्षात 10 लाख घरे बांधण्यात येणार आहे.
शासनाने काढलेला जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.