महाराष्ट्रात आता 22 नवीन जिल्ह्यांची भर पडणार आहे. कारण भौगोलिक दृष्ट्या मोठे असलेले जिल्हे आणि सर्वसामान्य नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्या येण्यास होणारी अडचण तसेच प्रशासकीय यंत्रणेवर येत असलेला ताण लक्षात घेवून आता सरकारने 22 नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचे ठरवले आहे. जिल्ह्यांची यादी खालील प्रमाणे…
प्रस्तावित 22 जिल्हे :-
- नाशिक – मालेगाव, कळवण
- ठाणे – मीरा भाईंदर, कल्याण
- पालघर – जव्हार
- अहमदनगर – शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर
- पूणे – शिवनेरी
- रायगड – महाड
- सातारा – माणदेश
- बीड – अंबाजोगाई
- लातूर – उदगीर
- रत्नागिरी – मानगड
- नांदेड – किनवट
- जळगाव – भुसावळ
- बुलढाणा – खामगाव
- अमरावती – अचलपूर
- यवतमाळ – पुसद
- भंडारा – साकोली
- गडचिरोली – अहेरी
- चंद्रपूर – चिमूर
सदरील 22 जिल्ह्यांची लवकरच निर्मिती केली जाणार आहे. शासनाने अधिकृत असा अध्यादेश किंवा निर्णय घेतलेला नसला तरी नवीन जिल्हे निर्माण होणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. जिल्हा निर्मिती करतांना प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करावी लागते, प्रक्रियेला सुरूवात झाल्याचे सांगण्यात येत आहे. लवकरच शासनाकडून याबाबत अधिकृत पाऊल उचलण्यात येणार असून जिल्ह्यांची निर्मिती लवकरच होईल असेही सांगण्यात येत आहे.
सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.