महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या पीएम किसान योजने प्रमाणेच राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत 2000 रूपयांचे 3 हप्ते म्हणजेच वर्षाला 6000 रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे, तसा जीआर सुध्दा निघाला आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता ट्रान्सफर केला जाणार आहे.
मात्र नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे. सर्वात पहीली अट म्हणजे जे शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांनाच 2000 चा हप्ता दिला जाणार आहे. तसेच सदरील हप्ता घेण्यासाठी ekyc केलेली असणे, Land Seeding म्हणजेच जमीन लिंक असणे, बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे.
सदरील अटी पूर्ण करणाऱ्यांनाच नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्यांनी आतापर्यंत e-kyc केलेली नाही, त्यांनी जवळच्या CSC केंद्रात जावून ekyc करून घ्यावी, तसेच बँक खाते आधारशी लिंक नसेल तर बँक जावून करून घ्यावे, तसेच जमीन लिंक नसेल तर तहसिल मध्ये किंवा कृषि विभागात जावून लिंक करून घेणे आवश्यक आहे.
सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.