नागपूर मुंबई ही बुलेट ट्रेन झाल्यास अवघ्या साडेतीन तासात नागपूर ते मुंबई हा प्रवास पूर्ण होणार आहे. सदरील प्रकल्पामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना लाभ होणार आहे. बुलेट ट्रेनच्या मार्गात येणाऱ्या जिल्ह्यांनाच नव्हे तर शेजारील जिल्ह्यांना सुध्दा या मार्गाचा फायदा होणार आहे.
सदरील मुंबई – नागपूर बुलेट ट्रेनचा मार्ग हा समृध्दी महामार्गाशी पॅरलल म्हणजेच समांतर राहणार आहे. सदरील बुलेट ट्रेनचा मार्ग जवळपास 68% भाग हा समृध्दी महामार्ग सोबत राहणार असल्याचीही माहिती आहे. या रेल्वे मार्गावर एकूण 13 स्टेशन सुध्दा विकसित केले जाणार आहेत.
राज्यासाठी महत्वपूर्ण असलेला हा बुलेट ट्रेनचा मार्ग कोणत्या जिल्ह्यातून किंवा तालुक्यातून जाणार हा प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तरही आहे. सदरील मार्ग नागपूर, वर्धा, खापरी, अजनी, पुलगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, कारंजा लाड, मालेगाव, मेहकर, शिर्डी, नाशिक, इगतपुरी, शहापूर, ठाणे, मुंबई इत्यादी जिल्हे अथवा तालुक्यातून जाणार आहे.
सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर महत्वाची माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.