इमानदार आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचित असलेले तुकाराम मुंढे यांची वारंवार बदली करण्यात येते. मागील काळात तर त्यांना कोणतीच जबाबदारी न देता अनेक दिवस फक्त खाली ठेवण्यात आले, म्हणजेच वाघाला जंगलात न सोडता पिंजऱ्यात कैद करण्याचा हा प्रकार म्हणावा लागेल. परंतू त्यांना विरोध करणाऱ्यांना तेही शक्य झाले नाही, कारण तुकाराम मुंढे हे IAS अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कोणती ना कोणती जबाबदारी द्यावीच लागेल.
बऱ्याचदा तुकाराम मुंढे यांच्याकडे असा विभाग देण्याचा प्रयत्न करण्यात येतो ज्याला इतर विभागापेक्षा कमी महत्व दिले जाते, किंवा जो विभाग दुर्लक्षित असतो, परंतू वाघाला मोकळ्या राणात सोडा किंवा घनदाट जंगलात सोडा तो त्याचे काम करणारच असतो.
तुकाराम मुंढे यापूर्वी मंत्रालयात मराठी भाषा विभागात कार्यरत होते, मात्र आता तेथूनही त्यांची बदली करण्यात आली आहे. आता त्यांच्याकडे कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्सयव्यवसाय विभागाचे सचिव म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. खरं म्हणजे हा विभाग खूप महत्वाचा आहे कारण हा विभाग शेतकऱ्यांशी संबंधित आहे. या विभागाला अशाच अधिकाऱ्याची गरज होती. अर्थातच या विभागालाही तुकाराम मुंढे योग्य तो न्याय देतील हीच अपेक्षा आणि त्यांच्या पुढील वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा….