सुशिक्षित बेरोजगारांना स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. जिल्हा उद्योग केंद्रा मार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. केंद्राचीही PMEGP योजना आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने राज्याची स्वतंत्र CMEGP योजना सुरू केली आहे.
Mukhyamantri Rojgar Yojana
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्राचा नागरिक असावा, शिवाय त्याचे वय 18 ते 45 असावे. (अ.जा., अ.ज, महिला, दिव्यांग, माजी सैनिक इत्यादीसाठी 5 वर्षे शिथील) उत्पादन व्यवसायासाठी 50 लाखापर्यंत कर्ज घेता येते, तसेच कृषि व सेवा उद्योगासाठी 20 लाखापर्यंत कर्ज घेता येते. जिल्हा समिती तर्फे मुलाखत घेवून लाभार्थ्यांची निवड केली जाते.
विशेष म्हणजे या योजनेच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्या Open खुल्या प्रवर्गासाठी शहरी भाग असेल तर 15 टक्के अनुदान व ग्रामीण भाग असेल तर 25 टक्के अनुदान म्हणजेच सबसीडी दिली जाते. स्वत:चे भांडवल 10% लागते. तसेच अनुसूचित जाती, जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक, इतर मागासवर्ग, विमुक्त व भटक्या जमाती, अल्पसंख्याक यांच्यासाठी शहरी भाग 25% अनुदान व ग्रामीण भागासाठी 35 टक्के अनुदान दिले जाते. स्वत:चे भांडवल 5% लागते.
CMEGP म्हणजेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://maha-cmegp.gov.in या वेबसाईटला अथवा आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा उद्योग केंद्राला भेट देवून अधिक माहिती घेता येईल.