महाराष्ट्र शासनाने Modi Awas Yojana for OBC सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार कडून वेळोवेळी विविध योजना राबविल्या जातात, ज्यामध्ये विविध घटकातील लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातो, अर्थात त्यांना आर्थिक मदत केली जाते.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर केला होता यामध्ये ओबीसींसाठी घरकूल योजना व लहान समाज घटकांसाठी महामंडळाची घोषणा केली होती. आता शासनाने थेट जीआर काढला आहे. या जीआरमुळे ओबीसींना घरकुल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Modi Awas Yojana for OBC in Maharashtra
शासनातर्फे याआधीही घर बांधण्यासाठी विविध योजनांचा लाभ देण्यात येत होता, मात्र आता ओबीसींसाठी स्वतंत्र योजना सुरू करण्यात आली आहे. सदरील मोदी आवास योजना अंतर्गत आता ओबीसींसाठी 10 लाख घरे मंजूर करण्यात आली आहे, त्यामुळे राज्यातील ओबीसी समाजाला मोठा दिलासा मिळणार आहे. कोणाला मिळणार घरकुल आणि किती पैसे मिळणार आणि जीआर पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा….