Your Alt Text

काय धंदा मांडलाय का ? कलेक्‍टर साठी 100 रूपये मग तलाठी होण्‍यासाठी 1000 रूपये फी घेवून खाजगी कंपन्‍यांचे खिसे भरायचे का ? | MLA Rohit Pawar Speech

MLA Rohit Pawar Speech : राज्‍यात वेळोवेळी लाखो विद्यार्थी, विद्यार्थीनी सरकारच्‍या वतीने घेण्‍यात येणाऱ्या स्‍पर्धा परीक्षा व इतर परीक्षा देत असतात, मात्र प्रत्‍येकवेळी या बेरोजगार तरूणांकडून फीच्‍या नावाने हजारो रूपये उकळले जातात आणि खाजगी कंपन्‍यांचे खिसे भरले जातात, याच मुद्यावर राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी आक्रामक होत भुमिका मांडली असून याची राज्‍यभरात चर्चा सुरू झाली आहे.

अनेक गोरगरीब युवक युवती उच्‍च शिक्षण घेवून नोकरीच्‍या शोधात असतात, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती वाईट असते, हाताला काम नसते, शिवाय कुटुंबाची जबाबदारी आणि अनेक संकटांचा सामना करत जगावे लागते, असे लाखो तरूण तरूणी आहेत. त्‍यामुळे नोकरी मिळाल्‍यास आपली आर्थिक अडचण दूर होईल आणि कुटुंबाचा उदरनिर्वाहही योग्‍य प्रकारे करता येईल म्‍हणून युवक विविध स्‍पर्धा परीक्षा देत असतात.

MLA Rohit Pawar Speech

आधीच आर्थिक स्थिती चांगली नसताना मात्र स्‍पर्धा परीक्षांसाठी दर वेळेस 1000 रूपये जर आकारले जाणार असतील आणि खाजगी कंपन्‍यांचे खिसे भरले जाणार असतील तर या गरीब व सामान्‍य कुटुंबातील युवकांनी प्रत्‍येक परीक्षेसाठी हजारो रूपये आणायचे कुठून ? असा प्रश्‍न आता उपस्थित होवू लागला आहे. याच मुद्यावर आमदार रोहीत पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी विधीमंडळात आक्रामक भुमिका घेत हा गंभीर प्रश्‍न उपस्थित केले आहेत.

आमदार रोहीत पवार यांनी आकडेवारीसह राज्‍यात आणि देशातील इतर राज्‍यात किती फी घेतली जाते याची आकडेवारीच दिली, कशाप्रकारे कोट्यावधी रूपये बेरोजगार तरूणांकडे वसूल केले जात आहेत आणि कंपन्‍यांचे खिसे भरले जात आहेत याचा पाढाच वाचला. शिवाय सामान्‍यांचे प्रश्‍न सुटत नसतील तर आमदार होवून करायचं काय ? असा उद्विग्‍न सवालही त्‍यांनी उपस्थित केला. काय म्‍हणाले रोहीत पवार यासाठी खालील लिंकला क्लिक करा….

आमदार रोहीत पवार आक्रामक होवून काय म्‍हणाले ? येथे क्लिक करा…

Leave a Comment

error: Content is protected !!