मिनी ट्रॅक्‍टरची किंमत किती आणि सुविधा काय आहेत ? माहिती खालील प्रमाणे….

सदरील ट्रॅक्‍टर हे स्‍वराज कंपनीने तयार केले असून त्‍याचे नाव Swaraj Code Mini Tractor असे आहे. हा मिनी ट्रॅक्‍टश्र आकाराने खूपच छोटा आहे, या ट्रॅक्‍टरच्‍या माध्‍यमातून शेतातील अनेक कामे सहज आणि जलदगतीने करणे शक्‍य होणार आहे. सदरील ट्रॅक्‍टर 399cc 1 सिलेंडर इंजिनने 11 हॉर्सपावर निर्माण करतो, या ट्रॅक्‍टरच्‍या तेलाच्‍या टाकीची क्षमता 10 लिटर एवढी आहे.

सदरील मिनी ट्रॅक्‍टरचे वजन अंदाजे 455 किलो असून उचलण्‍याची क्षमता 220 किलो आहे. यामध्‍ये 6 गिअर्स असून यापैकी 3 फॉरवर्ड तर 3 रिव्‍हर्स आहेत, ट्रॅक्‍टर मध्‍ये 2 व्‍हील ड्राईव्‍ह आहे. या ट्रॅक्‍टरचे मॉर्डल स्‍वराज कोड 2WD असे असून याची एक्‍स शोरूम किंमत 2.45 ते 2.50 लाख आहे.

सदरील ट्रॅक्‍टर शेतकऱ्यांच्‍या दृष्‍टीने बजेट मध्‍ये तयार करण्‍यात आल्‍याचे सांगण्‍यात येत आहे. ट्रॅक्‍टरवर 1 वर्षाची वॉरंटी सुध्‍दा मिळते. कमी खर्चात शेतातील अनेक कामे हा मिनी ट्रॅक्‍टर करू शकतो असे कंपनीकडून सांगण्‍यात येत आहे. तरीही शेतकरी बांधवांनी या ट्रॅक्‍टरची योग्‍य ती माहिती घेवूनच पुढील विचार करावा.

सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…

बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्‍या मोबाईलवर नेहमी मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!