मारूतीच्या कार इतरांपेक्षा मायलेज देण्यात अग्रेसर म्हटले जाते. कारच्या मायलेजचे टेंशन संपवण्यासाठी आता मारूती नवीन स्विफ्ट हायब्रीड कार मार्केट मध्ये आणत आहे. या कारमुळे मार्केट मध्ये अनेक कंपन्यांच्या कारला मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे ही कार 40 कि.मी. चे मायलेज देणार आहे.
मारूतीच्या हायब्रीड कारचे वैशिष्ट्ये म्हणजे या कार मध्ये पेट्रोल इंजिन तर असेलच मात्र सोबतच लिथियम आयन बॅटरी सुध्दा असेल अर्थात इलेक्ट्रिक मोटारचा पर्याय असेल. यामुळे कारचे मोठे कार्य बैटरी वर आधारीत संचालित होणार आहे. यामुळे कारचे मायलेज बरेच वाढणार आहे.
एका रिपोर्टनुसार मारूती लवकरच आपल्या स्विफ्ट आणि डिझायर या कारचे हायब्रीड मॉडल लॉन्च करणार आहे. मारूतीने 2005 मध्ये स्विफ्ट कार आणली होती, तेव्हापासून ही कार बेस्ट सेलर म्हणजेच जास्त विक्री होणारी कार बनली आहे. सदरील हायब्रीड कार जवळपास 40 कि.मीचे मायलेज देणार आहे.
कंपनी यामध्ये चांगल्या दर्जाची बैटरी लावणार आहे, त्यामुळे ही कार देशातील सर्वात जास्त मायलेज देणारी कार बनणार आहे. प्राप्त माहितीनुसार या कारची किंमत सध्याच्या कारपेक्षा 1 ते दिड लाख रूपये जास्त असणार आहे. ही कार पुढील वर्षी मार्केट मध्ये येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.