शासनाने मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा सुध्दा निर्णय घेतला आहे. त्याची कार्यवाही सुध्दा सुरू झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच सबंधित पोलीस अधिकाऱ्यांना मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्ज प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
शासन आदेशानुसार अप्पर पोलीस अधिक्षक व पोलीस उपअधिक्षक हे आंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलनातील आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी जबाबदार आहेत. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी लोकसेवकाला अशोभनीय ठरणारे कृत्य केल्याने महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचा भग केल्याचे निदर्शनास येत आहे.
त्यानुषंगाने संबंधित जालना अपर पोलीस अधिक्षक राहुल खाडे, व उपविभागीय पोलीस अधिकारी (Dy.SP) मुकुंद आघाव, अंबड उपविभाग यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येत आहे. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात येत आहे. शासनाचा आदेश वाचण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा…
अप्पर पोलीस अधिक्षक निलंबन आदेश…
उपविभागीय पोलीस अधिकारी निलंबन आदेश…
सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर महत्वाची माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.