Your Alt Text

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर झाली ही कार्यवाही ! शासनाने थेट आदेश काढले ! | Maratha Agitation Lathicharge Case

Maratha Agitation Lathicharge Case : मराठा समाज बांधवांच्‍या वतीने आरक्षणासाठी आंतरवाली सराटी (ता.अंबड, जि.जालना) या ठिकाणी सुरू असलेल्‍या उपोषण व आंदोलन कर्त्‍यांवर झालेल्‍या लाठीचार्ज बद्दल शासनाने महत्‍वाचे पाऊल उचलून संबंधितांवर कार्यवाही केली आहे.

आपणास माहितच आहे की, मराठा समाजाच्‍या वतीने आंतरवाली सराटी येथे शांतपणे आंदोलन सुरू होते, आपल्‍या मागण्‍यांसाठी गावातील बंधू, माता भगीनी मोठ्या संख्‍येने उपोषण स्‍थळी बसले होते, त्‍यांचे आंदोलन शांततेच्‍या मार्गाने सुरू होते.

मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी उपोषणाच्‍या वेळी परिस्थिती योग्‍य पध्‍दतीने न हाताळता समाज बांधवांवर लाठीचार्ज सारखे पाऊल उचलले, यामध्‍ये असंख्‍य नागरिक, माता भगीनी जख्‍मी झाल्‍या. सदरील घटना घडल्‍यानंतर संपूर्ण महाराष्‍ट्रातून तिव्र प्रतिक्रिया उमटल्‍या होत्‍या.

Maratha Agitation Lathicharge Case

सरकारच्‍या वतीने सदरील प्रकरणाची प्राथमिक चौकशी केल्‍यानंतर असे निदर्शनास आले की, सदरील अधिकारी यांनी आंदोलनाच्‍या वेळी परिस्थिती योग्‍य पध्‍दतीने हाताळली नाही, त्‍यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्‍यात आले आहे. यामध्‍ये अप्‍पर पोलीस अधिक्षक व पोलीस उपअधिक्षक यांचा समावेश आहे. शिवाय पोलीस अधिक्षक यांना यापूर्वीच सक्‍तीच्‍या रजेवर पाठवण्‍यात आलेले आहे. शासनाने संबंधित अधिकाऱ्यांचे थेट निलंबन आदेश काढले असून सदरील आदेश वाचण्‍यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे…

पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन आदेश पाहण्‍यासाठी येथे क्लिक करा…

Leave a Comment

error: Content is protected !!