Maharashtra Tar Kumpan Yojana : शेतकऱ्यांना शेती करतांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते, कधी आस्मानी तर कधी सुल्तानी संकटांचा सामना करावा लागतो. दिवसरात्र मेहनत घेवून पिकांची काळजी घेतली जाते, मात्र या पिकांची प्राणी नासधूस करतात किंवा पिकांचे नुकसान करतात, त्यामुळे शेतकरी हतबल होतात.
जंगली किंवा रानटी प्राण्यांना हाकलून लावण्याचा शेतकरी प्रयत्न करत नाहीत असं नाही, अनेकदा प्रयत्न करूनही सदरील प्राणी पुन्हा पुन्हा येतात, आणि नासधूस करतात, सदरील प्राण्यांमुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते, म्हणजेच नफा तर सोडाच शेतात खर्च केलेले पैसेही निघणेही मुश्किल होते.
Wire Fencing Subsidy Scheme
शेती करतांना शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी नसतांना उलट होणाऱ्या नुकसानामुळे शेतकरी त्रस्त होवून जातात, शेताला तार कुंपण लावावे तर त्यासाठी पैसे नसतात, मग अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना काय करावे हा प्रश्न पडतो, मात्र आता जंगली प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने शासनाची एक महत्वपूर्ण योजना महत्वाची ठरणार आहे.
Maharashtra Tar Kumpan Yojana
सदरील प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी शासनाने आता एक तार कुंपण योजना सुरू केली आहे, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तार कुंपणसाठी जवळपास 90 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. काय आहे योजनेचे नाव, कसा मिळेल योजनेचा लाभ, कुठे अर्ज करावा लागेल या बाबतच्या माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा…