सरकारने कोणत्‍या विभागात नोकर भरती जाहीर केली आहे ? माहिती खालील प्रमाणे…

महाराष्‍ट्र सरकारने नवीन 11 हजार पदांची भरती जाहीर केली आहे. सदरील भरती ही आरोग्‍य विभागात होणार असून याबाबत आरोग्‍यमंत्री तानाजी सावंत यांनी माहिती दिली आहे. सदरील नोकर भरतीमुळे राज्‍यातील असंख्‍य तरूणांना रोजगाराची संधी उपलब्‍ध होणार आहे.

सद्स्थितीत आरोग्‍य विभागात कमी मनुष्‍यबळ असल्‍यामुळे सध्‍या कार्यरत असलेल्‍या कर्मचाऱ्यांवर मोठा ताण पडत आहे. याबाबत सरकारकडे वारंवार तक्रारी प्राप्‍त होत होत्‍या, सरकारकडून लवकरच तोडगा निघेल अशी चर्चा असतांनाच आता आरोग्‍य विभागाने महत्‍वाचे पाउल उचलत तब्‍बल 11 हजार पदांची भरती जाहीर केली आहे.

आरोग्‍य विभागात क आणि ड गटातील एकूण 10 हजार 949 पदांची मेगा भरती होणार आहे. मागील काळात सदरील भरती होणार होती, मात्र पेपर फुटीचा घोटाळा लक्षात घेवून प्रक्रिया थांबवण्‍यात आली होती, मात्र आता सदरील प्रक्रिया सुरू करण्‍यात आली आहे. सदरील नोकर भरतीची प्रक्रिया TCS या कंपनीमार्फत राबविली जाणार असल्‍याचीही माहिती समोर येत आहे. नोकरी भरतीमुळे राज्‍यातील असंख्‍य तरूण तरूणींना मोठा दिलासा मिळणार आहे.

सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…

बांधवांनो, सरकारी योजना व इतर महत्‍वाची माहिती आपल्‍या मोबाईलवर नेहमी मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!